प्रवास


दवाचे थेंब अजून सुकले नाहीत
पहाट अजून पुरती उगवली  नाही
पूर्वेला असते रोजच केशरी किरणांची  प्रभा
पण आज तरी पाहून घेईन सगळे
पुन्हा पाहीन ना पाहीन कधी...
थोडेसे थांबशील ना
जरा मनाला सावरून घ्यायचे आहे
थोडी वाट बघशील ना
थोडासा भूतकाळ आवरून घ्यायचा आहे
तेवढी  उसंत देशील ना....
खंत तरी कशाची करू
आयुष्यात सुख बनून आले
भर दुपारच्या सावलीसारखे
पायाशी घोटाळले अगदी जवळ
पण अगदी इवलेसे दिसेल ना दिसेलसे  ......
खरच का रे
प्रेम देते आयुष्य अन 
प्रेमच  देते जीवनात मुक्ती?
एकच क्षण असावा प्रेमाचा 
अन बाकी असावा का प्रवास मरणाचा?....

No comments: