विवाह सोहळा म्हणजे,

विवाह सोहळा म्हणजे,
वधू - वर  मिलन,
सनई चौघड्यांच वादन 
पाहुण्या मंडळींचं आगमन,

नवरदेवाची मिरवणूक,
पिऊन तर्र असणाऱ्यांची,
सगळ्यांनाच हसवणूक,
कंटाळलेल्या बापड्यांची मात्र 
उगाचच पिळवणूक,    

पुरोहिताची मंगलाष्टकाला सुरुवात, 
वधू-वराची नव्या आयुष्याची रुजवात, 
मध्यंतरात सत्कारांचीच बरसात, 
नसते मात्र मान्यवरांची खबरबात, 

वरमाला घालताना देवाचे नमन,  
सप्तपदीत मनातून दिलेले वचन,
वधूच्या डोळ्यातले पाणी,
सांगते माहेरच्या प्रेमाची कहाणी, 

भोजन पंगतीत वधू -वर ही वाढतात,
प्रेमाच्या मायेन आग्रह ही धरतात,
वरमाया थोड्या धुसफूस करतात,
मान असताना पण उगाचच भाव खातात,  
   
वधू मातेची मात्र घालमेल खूप काही सांगते,
हे बघून पापणीची कडाही ओलावते, 
बिदायीला वधू पिता धाय मोकलून रडतो,
लहानपणीची लाडाची लेक आठवतो,

No comments: