मी बरसलो आज शब्दांतुन , |
तीला एकही शब्द ना कळला कधीमी ओघळलो आज डोळ्यांतुन , |
तीचा थेबंही ना गळला कधी. |
सोडुन मान सन्मान माझा मीच दगडापुढे हात जोडीले मी कोसळलो दरड होऊन , |
तीचा एकही बुरुज ना ढळला कधी. |
तीची एकही बोली नाही आज लिलावात या माझ्यामी बसलो बाजार मांडून , |
तीने भाव माझा ना विचारला कधी. |
आयुष्यभर तीच्या कुपंणाबाहेर जागा माझी नित्याचीमी राहीलो कुंपण बनुन , |
तीने हा निवडूंग अंगणात ना लावला कधी. |
सा-याच राती तीच्या चादंण्याच्यां मिठीत गेल्या मी जगलो काजवा होऊन , |
तीला उजेड माझा ना दिसला कधी. |
आठवतय रोज जाळं तीच पसरवण तळ्यात चद्रंबिबांसाठीमी राहीलो शिपलं बनुन , |
माझ्यातला मोती तीने ना शोधला कधी |
मी होतो पाखरु जळणारा ती ज्योत होती मला जाळणारी मी जळालो पाखरु बनुन , |
तिला एकही चटका ना लागला कधी. |
मी लाचार इतका की आज माझीच कीव मज यावीमी मला दिले आगीत झोकून , |
तीचा धुराकडेही जिव ना वळला कधी. |
आता मज नकोच तिच्या प्रेमाच्या उसण्या त्या थापामी चाललो स्वप्न मोडुन , |
तीने स्वप्नांतही मला ना सोडला कधी। |
त्या प्रेमाची आठवण...!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment