** एक छोटीशी पणती खिडकीच्या कोप-यात.. **




एक छोटीशी पणती ,
खिडकीच्या कोप-यात..

खोलीचा कोपरा न कोपरा उजळवणारी..

जगाचा प्रकाश पाहून
दिपणारी..
स्वत:च्या ज्योतीची धग
जपणारी..

तमाच्या गमनाने
दुखावणारी..
प्रकाशाच्या आगमनाने
सुखावणारी..

पतंगांना जीवापाड
लुभावणारी..
पतंगांच्या वेडाला
स्वीकारणारी..

वा-याच्या फुंकरींनी
लाजणारी..
वादळात अस्तित्वासाठी
झगडणारी..

पणतीखालच्या तमाने
मंदावणारी..
वातीच्या टोकावरून सूर्य
शोधणारी..

तेल संपत आलय
जाणवणारी..
म्हणून अधिकच तेजाने
प्रकाशणारी..

ती छोटीशी पणती ,
खिडकीच्या कोप-यात..

मनाचा कोपरा न कोपरा उजळवत विझणारी..

No comments: