पण मी तर फक्त आपले मन मांडत असतो ....

पण मी तर फक्त आपले मन मांडत असतो ....
विचाराच्या कलमाने मी काही शब्द लिहीतो
कोणी त्याला कवीता तर कोणी काव्य समजतो ,
स्वतःच त्या शब्दांशी आपले नाते जमवतो
अन 'वाह उस्ताद' अशी दाद देऊन जातो ,
पण मी तर फक्त आपले मन मांडत असतो........

डोळ्यांच्या अश्रू ऐवजी शब्द खाली उतरवतो
दुखला हसवण्याचा प्रयत्न तो तेवढा असतो,
जा माफ केले तूला म्हणून मनाला समजवतो
अन हसून शेवटी मी दुखाला मुर्ख बनवून जातो ,
पण मी तर फक्त आपले मन मांडत असतो .......

ती रचना अन त्याच्या शब्दाने कोणी सुखावतो
वाचकही त्याला आपली चाल लाऊन जातो,
तो शब्दच मला लोकांचा जवळ नेतो
अन तेवढ्यातच 'विरह कविता' म्हणून कोणी हीणवतो,
पण मी तर फक्त आपले मन मांडत असतो........

मी सच्चा आहे हे दाखवण्याचा प्रयास असतो
तुम्हाला सांगण्याचा व्यर्थ ध्यास तो ,
ज्याला कळावा त्याला त्याचा अर्थ कळत नसतो
अन तो तू ' एक कलाकार ' म्हणून चिडवतच असतो ,
पण मी तर फक्त आपले मन मांडत असतो .........

जो तो मला कवी म्हणून मिरवत असतो,
पण मी तर फक्त आपले मन मांडत असतो .........

पण मी तर फक्त आपले मन मांडत असतो .........


.…… मंदार बापट 

No comments: