जेव्हा कधी कोणाचं पोट जरा सुटू लागतं -


आम्ही म्हणालो, “आजकाल पँट होत आहे टाईट”
सारे म्हणाले, “अरे अरे बाबा, हे हार्टला फार वाईट”
यात नवीन काही नाही हो, लोकांच ज्ञान हे असंच उतू लागतं…
जेव्हा कधी कोणाचं पोट जरा सुटू लागतं!
कोणी म्हणे “बटाटे बंद आणि भात करा कमी”
“जॉग्गिंग करा रोज, पोटवाढबंदीची देतो मी हमी”
“सल्ला” ज्याला म्हणतात, असं बरंच काही लोकांना सुचू लागतं…
जेव्हा कधी कोणाचं पोट जरा सुटू लागतं!
कोणी म्हणतं, “रोज जिम ला जा, करा योगा”
ही म्हणते, “आधी दुर्लक्ष केलं ना… आता भोगा!”
यात नवीन काही नाही हो, बायकोचं डोकं हे असंच तापू लागतं…
जेव्हा कधी कोणाचं पोट जरा सुटू लागतं!
जीवनपद्धती साधी माझी, साधा सोप्पा व्यवहार…
रोज घरचंच खातो आणि नाही हो राक्षसी आहार!
हे आमचं सत्यवचनही सर्वांनाच केवळ एक “पळवाट” वाटू लागतं…
जेव्हा कधी कोणाचं पोट जरा सुटू लागतं!
- चंद्रजीत अशोक कांचन

No comments: