मदिरेचे अभंग


वाटते जे जे प्यावे , ते ते दुसर्‍यासी द्यावे
धुन्द करूनी सोडावे , सकळजन
म्हणो नये आपली, फक्त उघडावी बाटली
लाज कोणा वाटली, वाटो द्यावी
व्हिस्की असो वा रम, काही नसावा नियम
दोन पेगांनंतर संभ्रम, नाहीसा होतो
कधी प्यावे एकचित्ति, कधी दुसर्‍याच्या साथी
गुंग परि मति, होवो नये
मारी चिवड्याचे खकाणे, तैसेचि काही चकणे
शेवटी पिऊन टिकणे, महत्त्वाचे
चालता चालता प्यावे, कधी ‘घेऊन’ चालावे
नशापाणी व्हावे, मनासारखे
ज्यांना कळे मूलमंत्र, त्यांनाची आकळे तंत्र
स्कॉच अथवा संत्रं, परिणाम देई
- अमेय

No comments: