एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला आपल्या मनातले सर्व काही सांगावे,
सांगता सांगता आयुष्य पूर्ण सरून जावे,
आणि सरतानाही आयुष्य पुन्हा पुन्हा जगावे......

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला घेउन सोबतीने खुप खुप चालावे,
चालता चालता दुरवर खुप खुप थकावे,
पण थकल्यावरही आधारासाठी त्याच्याकडेच पाहावे......

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
दुःख त्याचे अणि अश्रु माझे असावेत,
सोबतीने त्याच्या खुप खुप रडावे,
आणि अश्रुंच्या हुंदक्यात सर्व दुःख विरून जावे.....
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
आनंद त्याचा आणि हसू माझे असावे,
त्याच्यासाठी मी जगतच रहावे, जगतच रहावे,
आणि त्याच्यासाठी जगतानाच आयुष्य संपून जावे......

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याच्या सोबतीतल्या प्रत्येक क्षणाने सुखावावे,

उन्हात त्याने सावली तर पावसात थेंब व्हावे,
आणि मायेच्या थेंबानि मी चिंब भिजुन जावे......
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
सुर त्याचा अणि शब्द मज़े असावेत,
सुरांबरोबर त्याच्या वा-यानेही झंकारावे,
आणि नकळतच गीत माझेही फुलावे.......

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला सोडताना पायाने अड़खलावे ,
पुन्हा भेट म्हणुन सांगताना मागे वलून पाहावे,
आणि डोळ्यातील भावनानी एकमेकाना समजवावे......
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
डोळ्यातील भावः माझ्या त्यालाही समजावे,
हृदयातील स्पंदनांचे अर्थही कलावे,
आणि नकळतच ते त्याच्याही ओठी यावे,
आणि हे प्रेम असेच रुजावे असेच फुलावे......
...........एकदा तरी आयुष्यात.............

No comments: