एक मुलगी मला एकदा भेटली

एक मुलगी मला एकदा भेटली
आणि खळी खुलवुन खुदकन गालात हसली
तीच ते हसण खुप विलक्षण होत
कोणीही तिचा मित्र होईल एवढ त्यात सामथ्य्र होत
त्या दिवशी एक मैत्र्य मला भेटल
का कुणास ठाउक पण फक्त मलाच अस वाटल
तिच्याशी मैत्री करावी एवढी हिम्मत मा़झ्यात नव्ह्ती
ती नाहि म्हणेल याचीच फक्त भिती मनातहोती
काय वाटेल तिला ह्याचा मि विचार करत होतो
तिच्या आठवणी काढत काढत रात्र रात्र जागत होतो
हो,पण आता परिस्थिती खुप वेगळी आहे
माझी आणि तिची चांगली गट्टी जमली आहे
तरीही तिच हसणं आता खुप कमी झालय
कुणास ठाउक तिच्या आयुष्यात अस काय घडलय
एक मित्र म्हणुन तिची दुख कमी करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करतो
पण हे तिला कळत नाही यात मी माझं दुर्दैव्य मानतो
म्हणुन आजही मला प्रश्न पडतो की मैत्री काय फक्त मीच केली होती
का तिच्याकडुन मी मैत्रीची अपेक्षा केली यात माझी काही चुक झाली होती
पण तरीही तिला आजही मला हसताना बघायचयं
कारण तिच्या रडण्यापेक्षा तिचं हसण किती गोड आहे हे तिला पटवुन द्यायचय
हे खर आहे कि ती हसते तेव्हा मी हसतो,ती रडते तेव्हा रडतो
आणि म्हणुनच कदाचित मित्रांमध्ये असल्यावर मी फसतो
आजही तिला साथ द्यायला मला आवडेल
हो पण याला तिची नक्कीच हरकत असेल
ती हल्ली जेव्हाही हसते
तेव्हा मला त्या दिवसाची आठवण येते
की तेव्हा एक मुलगी मला भेटली होती
आणि खळी खुलवुन खुदकन गालात हसली होती

No comments: