सांग न सोने असा दिवस कधी येईल . . ?

घराच्या बाल्कनीतून उभी राहून 
सोने तू चंद्राकडे पाहत राहील . .

मग दब्या पावलाने मी मागून येऊन
तुझ्या कमरेला अलगद विळखा घालीन . . 

तू हि हळूच मग मागे वळून
माझ्या नजरेला नजरकैद देशील . . 

त्या बोलक्या अशा धुंद नजरेने
तू मला अलगद मिठीत घेशील . .

प्रसंगावधान राखून मग चंद्रही
लाजेने त्या ढगाआड लपून जाईल ...

सांग न सोने असा दिवस कधी येईल ...
कधी येईल.. कधी येईल .

No comments: