आई...

"""आईचा कुरवाळणारा स्पर्श,
बाबांबरोबर शाळेत जाताना मिळणारा हर्ष..
परत लहान व्हायचे आहे मला,
आई बाबांच्या प्रेमात नहायचे आहे मला!

बहुला-बाहुलीचं लग्न,
भातुकलीच्या खेळात तासन्-तास् मग्न..
परत लहान व्हायचे आहे मला,
आई झोपली असताना खाऊ पळवायचा आहे मला!

मामा-मामी च्या रम्या गावी,
सगळे लाड पुरविणारे आजोबा-आजी..
परत लहान व्हायचे आहे मला,
ए राजी , ए हौशी करत बैलगाडीतून चक्कार मारायची आहे मला!

धाडसी शिवाजी महाराजांच्या गोष्टी,
आजोबांकडून ऐकायच्या आहेत उन्हाळ्याच्या सुट्टीत..
परत लहान व्हायचे आहे मला,
गर्क होऊन अनेक गोष्टी ऐकायच्या आहेत मला!

नाचत खेळत वाहणारं नदीचं पाणी,
इवलेसे सगळे जण .. प्रत्येकाच्या आंघोळी..
परत लहान व्हयाचे आहे मला,
आजीला पूजे साठी घागर आणून द्यायची आहे मला!

आकाश्यात लुक लुक करणारे असंख्य तारे,
मध्या रात्रीचे ते मंद, हळूवार वारे..
परत लहान व्हयाचे आहे मला,
मोठी झाले की डॉक्टर होण्याची स्वप्न पाहायची आहेत मला!

नवीन वर्ष .. नवीन उल्हास,
नवीन गणावेश , नवीन वह्या -पुस्तकांचा वास..
परत लहान व्हायचे आहे मला,
परत शिस्तीत शाळेत जायच आहे मला!

आल्लड ते बालपण आता नाहीसे झाले,
आयुष्यातील सगळ्यात सुंदर आठवणी मात्र ठेऊन गेले..
परत लहान होता येणार नाही मला,
परत लहान होता येणार नाही मला!"""

No comments: