तुझे ते दोन शब्द.......



तुझे ते दोन शब्द
मला हसवणारे,
मला सतावणारे,
तर कधी रडवनारेही....

तुझे ते दोन शब्द
फुलासारखे कोमल,
कळीसारखे नाजूक,
तर कधी काट्यासारखे टोचनारेही.....

तुझे ते दोन शब्द
मनाला आनंद देणारे,
दुखं हलके करणारे,
तर कधी खूप अश्रू देणारेही....

तुझे ते दोन शब्द
मन शांत करणारे,
मनावर भुरळ  घालणारे,
तर कधी मनात वादळ उठविणारेही....

तुझे ते दोन शब्द
तुला आठवायला पुरेसे आहे,
म्हणूनच ते मला,
हवेहवेसे आहे.......

No comments: