** उंबरठा **




भय अनामिक असे आज दाटून आले..
मेघ अभावित जसे आज दाटून आले..

ओलांडू कशी मी उंबरठा ?

किलकिले दार उघडता
सुख देत हाकारे बाहेरुन आले..

ना ओलांडू कशी मी उंबरठा ?

घुसमट सोसवेना मनीची
तडफड साहवेना कधीची
कोंडू कशी वेदनेला ?
मारु कशी जाणीवेला ?
सुख देत हाकारे बाहेरुन आले..
ना ओलांडू कशी मी उंबरठा ?

आहे,जग भयाण आहे
आहे,मीही तयार आहे
माघार घेऊ कशाला ?
दार लावू कशाला ?
सुख देत हाकारे बाहेरुन आले..
ना ओलांडू कशी मी उंबरठा ?

ना ओलांडू कशी मी उंबरठा ?

No comments: