** मनमंदिर **




दूर नसे मी तुला कधी
दुरावा नसे कधी उरी
बघ सये तू मन्मंदिरी
हासे,बोले नीत श्रीहरी

निशा कसली नि प्रभात केव्हा
तू दिशा नि तुच रस्ता
येते जेव्हा समीप सये
बासरीत माझ्या सूर तेव्हा

साद कोणती नि हाक केव्हा
तू आवाज नि तूच भाषा
घेते जेव्हा श्वास मंदसे
बासरीत माझ्या प्राण तेव्हा

स्वर्ग कुठला नि धरती केव्हा
तू आसरा नि तूच निवारा
गाते जेव्हा गीत अबोलसे
बासरीत माझ्या जीव तेव्हा

अधर काय नि ओंजळ केव्हा
तू तन नि तूच आत्मा
होते जेव्हा मिलन अपुले
बासरीत माझ्या सॄजन तेव्हा
a

No comments: