मन...


...तुझेच होऊ पहातेय ....

मनाचे काय मन चंचल
हळूवार नाजुक
हा देह सोडू पाहतेय
मन तुझेच होऊ पाहतेय...

मनात भावनांचा कल्लोळ
विचारांचे काहूर शब्दांची घालमेल
अन नात्यांचा पाऊस
ह्या सर्व त्रासातून सुटू पहातेय
मन तुझेच होऊ पाहतेय...

मन मंदिरातील घंटा घुमटाचा कळस
कधी पवित्र तीर्थ तर परसातील तुळस
सदैव तुझीच भक्ती करू पहातेय
मन तुझेच होऊ पाहतेय...

मन नदीसारखे अवखळ तर नभासारखे विशाल
सागरासारखे खोल तर धरणी सारखे निश्चल
त्याचा स्वभाव सोडू पहातेय
मन तुझेच होऊ पाहतेय...

मन सूर्यासारखे प्रखर कधी चंद्रासारखे शीतल
नाक्षत्रांसारखे अचल तारकांसारखे दूर
तुझ्या अन तुझ्याच जवळ येऊ पहातेय
मन तुझेच होऊ पाहतेय...

मन मनासारखेच गूढ देहासाराखेच नश्वर
मन अत्म्यासारखे तेजपुंज ह्या विश्वाचे अंतरंग
मन अमर होऊ पहातोय
मन तुझेच होऊ पाहतेय...

मन हिमाचा खंड
मन पाण्यावरचा तरंग
मन वादळी वरा
मन पावसाची धारा
मन तुझ्यावरच बरसू पहातेय
मन तुझेच होऊ पाहतेय...

मन हृदयाचा आरसा,
मनाचा वारसा
मन अभेद्य अचल
हिमालयासारखे विशाल
मन तुझ्यासाठी खुप लहान होऊ पहातेय
मन तुझेच होऊ पाहतेय...

मनं छिन्दन्ति शस्त्राणि
मनं दहति पावकः
न मनं क्लेदयन्त्यापो
न शोषयति मारुतः
तरीही तुझ्यात विलीन होऊ पहातेय
मन तुझेच होऊ पाहतेय...

पण माझे मन म्हणजे मी नाही
मी अन मन वेगळे आहोत
मन एक जाणीव तर मी एक मुक्त आत्मा
हे तुला परत परत ते दाखऊ पहातेय
मन तुझेच होऊ पाहतेय...
मन तुझेच होऊ पाहतेय...

 

-अनामिक 

No comments: