गर्दीत मी एकटा चाललो ..

गर्दीत मी एकटा चाललो ..
हो एकटा चाललो ..
मनातले वादळ शमवत चाललो ..

हो एकटा चाललो ...
कुणी न घेतले मज समजून
न उमजून...
माणुस धर्म निभवत चाललो..

हो एकटा चाललो...
एकटा जन्मलो या धरतीवर..

हो एकटाच मरणार...
मैत्रीच्या नात्यात स्वतःला गुंतवत चाललो ..
मनाचा गुंता सोडवत चाललो ..

हो एकटा चाललो....
घेतले न मज कुणी समजुन..
डोळ्यातले अश्रु मी लपवत चाललो ..
मनात मी रडत चाललो ...

हो एकटा चाललो ...
जन्म एकदाच मिळे..
त्याचे महत्व स्वतःस समजावत चाललो..
सर्वांचे मन मी जिंकत चाललो ..

हो एकटा चाललो ...
आलो एकटा जाणार ही एकटाच...
निसर्गाचा नियम मी पाळत चाललो ..
स्वार्थीपणा मी सोडत चाललो ..

हो एकटा चाललो ...मी एकटा चाललो...!!!!
-अनामिक

No comments: