मलाच मी अनोळखी...

मलाच मी अनोळखी...


मी एकटा... मी पोरका... आहे न कुणी सोबती...
व्यस्त मी विसावता....मलाच मी अनोळखी...


जगण्यास ह्या अर्थ का...मरण आहे क्षणोक्षणी...
धावतो नुसताच मी...मुक्कामाचे कोडे घेऊन उरी..


अनंत मी...अल्प मी...माझा मला पुरेल मी...
बेधुंद मी...बेफिकीर मी...येणाऱ्या क्षणांना चीरडेल मी..


अक्राळ मी...विक्राळ मी....भूतकालाचा परिणाम मी...
मौन मी.. शब्द मी...पावसात ह्या एकटाच रडतो मी...


विध्वंसक मी...निर्माता मी...वणव्याच्या राखेतून उभारलेला कोंब मी...
धीर मी.. गंभीर मी...गतकाळाचा उन्मत्त मी...


अतृप्त मी...आसक्त मी....पावसास पाहणारा चातक मी...
निशब्द मी..निस्तब्ध मी....दुनियेस अजाण अजूनही एकटाच मी...

No comments: