तोच शब्द हवा मला

लिहिता लिहिता थकतील 
अशी पाने नकोत मला 
लाख वेळा फाडली पाने 
त्यातलं एकच पण हव मला 
ज्याने घेतला मनाचा ठाव 
तोच शब्द हवा मला 
अर्थ आला ज्यामुळे कवितेला 
तीच ओळ भावली मला 
शब्दांचा हा खेळ 
माझं आयुष्य बदलून गेला 
मनाचा कल्होळ सारा 
जनाला सांगत गेला 
गोंधळलो कधी मनात 
एकटाच हरवलो 
शब्द होते संगतीला 
म्हणून कवितेतून दिसलो 
हसलो कधी मनात 
तोच शब्द आवडला 
रुसलो, हतबल झालो 
तोच शब्द मनी रुतला 
रुतणारा असा शब्दच नकोय मला 
लिहिता लिहिता थकतील 
अशी पानेच नकोत मला

No comments: