घरापासून दूर .......................


मी घरी कीतीही दिवसभर दंगा केला
तरी मला आई थोपटल्याशिवाय कधीच झोपली नाही
घरापासून दूर म्हणुनच आता कदाचित
शांत झोप कधी लागलीच नाही

कुणी वीचारते "तुला घरी जाऊस वाटत नाही"?
कस सांगू त्यांना घरातून निघताना
आईला मारलेली मीठी सोडवत नाही

आई तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते
आता माझ्यासाठी डब्बा करायचा नसतो
तरीही तू सहा वाजताच उठतेस

तुझ्या हातचा चहा तुझ्या हातची पोळी
तुझ्या हातची माझी न आवडती भाजी खायला
आजही जीभ आसुसली

घरापासून दूर .......
आई जग खुप वेगळे आहे
तुझ्या सावलीत अगदी बिनधास्त होते
आता रानागानत उन आहे

तू आपल्या पील्लान साठी
सगळ केलस एक दिवस पिल्लं म्हणाली
आई आता आम्हाला जायचय
आणि तू त्यांना जाऊ दीलस

आई तू इथे नाहीस
बाकी माझ्याकडे सगळे आहे
घरापासून दूर
जग खुप वेगळे आहे
------------

No comments: