कोण खरी

खूप रागावलो मी कधी तर मग,
माझीच नक्कल करुन
हसवणारीस तू
आणि कधी स्वताच फ़ूरंगटून
बसणारीस तू
कोण खरी ?
कधी मग उगीचच साधी बस नाही मिळाली म्हणून
रडवेली झालेली तू खरी ..
की घाई घाईत तवा भाजला तरी
’काही नाही रे’ ’तू जा, उशीर झालाय ..घड्याळ काय शो साठी बांधलेस काय...’
म्हणून हसत पाठवणारी तू
खरी कोण ?
कधी दोन तासात ..फोन नाही केला म्हनून ..
चिडनारी तू ..
आणि कधी
’कित्ती वेळा फोन करतॊस रे..?’
’आज काम नाहीए का तूला ...ठेवतेय मी’
मला रागावणारी तू ...
कधी मग आशा - गुलजार ची गाणी
मला समजावून सांगणारी तू ..
की ..
कधी चल AC मध्ये बसून गप्पा मारुयात ..
म्हनून एखाद्या FLOP पिक्चर ला घेउन जाणारीस ..तू..
अगदी परवाचीच गोष्ट का गं?
रस्त्यावरच्या त्या पिल्लाला उचलून ..
जररा आत सोडून आलो तर,
’चल आता घरी जाउन हात धू ..’
की
त्याच संध्याकाळी ..
’काय मस्त होते ना रे ते पिल्लू’
’थोडा वेळ आणिक धरले असतेस तर ..
मी ही हात लावला असता ना ? अगदी मऊ असेल ना रे?’
नाराज होणारी तू
मी म्हनालॊ मग ..
’कशी अशी दोन्ही बाजूंनी बोलतेस’ तर..
’कूठल्या रे दोन बाजू .. ? मला confuse नकोस करु’, म्हणालीस ..
कोण .. confuse आहे गं ?
तू की मी की मग दोघंही.. ?
काल तूला मग विचारलेच ...न रहावून...
’खरचं यातली कोण "खरी" तू...
तेव्हा ..
’कित्ती observe करतोस .. रे मला ’ ..
म्हणून डोळ्यात पाणी आणनारी तू..
की लगेच डोळे ... नाक.. पूसून मग
’तू सगळया पोरींना अस्सेच का रे observe करतोस ..?’
डोळा मारत खिद्ळनारी तू ?
कोण खरी?
-निखिल पुरवंत

No comments: