मला सारेच सोडून जातील..



एक एक करत 
उद्या सारेच दूर होतील 

ज्याला जवळ केले
उद्या सोडून मला जातील 

फुलांसारखे जपलेले नाते हे 

उद्या ते ही सुकून जाईल 

पाकळी पाकळी सारखे 
मला उद्या एकटे करून जाईल 

नसेल उद्या सोबत कुणी 

मग ....

जगणार मी कसा 

खरे तर नजरेस 
तुमच्या मी दिसणार नाही उद्या 

सावली सारखे वागलो सोबत 

आता ते ही मी काढणार 

खरेच सांगतो मी तुला एकांता 

असह्य होतात रे नात्यांच्या भावना 

आता तर अश्रू ही 
अपुरे पडतात ह्या डोळ्यांना ...

खरच मी पडतो रे एकटा 
नाही कुणी माझे 

कुणास ठावूक तिरडी वरही त्यांची 

येतील कि नाही फुले 

एक एक करून
मला सारेच सोडून जातील ....

जग हे सोडून मी निघून जाईल ....
-
© प्रशांत शिंदे

No comments: