आजकालचे प्रेम . . .




प्रेम जेव्हा होते, तेव्हा काहीच माहिती नसते,
तो तिचा प्रियकर आणि ती त्याची प्रेयसी असते,

भेटतात कुठल्या वळणावर, मग पटकन नजर भिड़ते,
अगोदर मित्र बनतात आणि नंतर मांजर आडवी जाते,

मग गप्पागोष्टी आणि रुसव्या-फुगव्याचा चालू होतो खेळ,
उठल्यापासून ते झोपेपर्यंत फ़क्त होते विचारांची भेळ,

माहित असते दोघांना, की ते प्रेमात पडले आहेत,
कोण विचारेल अगोदर, पण घोड़े कुठे अडले आहे,

करून थोडीशी हिम्मत, मुलगा बाजीराव पेशवा बनतो,
मनात असुनही थोड़े झुलवत ठेवत त्याला, मस्तानीचा गेम चालू असतो,

शेवटी होकार मिळतो आणि प्रेम प्रकरण चालू होते,
प्रेमाला त्या साक्षी मानून शपथांची यादीच तयार होते,

तू नाही भेटलीस तर मी जिव देईन, असे बाण सुटतात,
तुझ्याशिवाय मी ही अधुरीच, हे ऐकून डायरेक्ट काळजात घुसतात,

हळुहळु सरकत हे प्रेम पुढे जाते,
मग लग्नाची वेळ शोधू पाहते,

जात पडताळणिचा मग, चालू होतो खेळ,
तो नाही माझ्या जातीतला, मग बसेल कसा मेळ,

दुसऱ्याच दिवशी ब्रेक अपचे, फरमान असे निघते,
बाबांना मी वचन दिले आहे, असे कारण असते,

हे ऐकून मुलाला, मोठा धक्काच बसतो,
इंटरवल नंतर मग, देवदास पिक्चर चालू होतो,

काही दिवस तिच्या आठवणीत, तो सतत रडत राहतो,
आता कोण येईल आयुष्यात माझ्या, याचीच वाट पाहतो,

परत कुठल्यातरी वळणावर, त्याला नविन धड़क बसते,
आता हीच माझी प्रेयसी, मग हृदयाची शिट्टी हळूच वाजते,

असे हे आजकालचे प्रेम, काय खोटे नि काय खरे,
कितीही लांब राहण्याचा प्रयत्न केलातरी, बळी पडतातच सारे . . .

No comments: