बासुरीची धून

बासुरीची धून ऐकता बेधुंद राधा मोहरली.
घट डोईवरी घेवुनी ठुमकत ती थिरकली.

लटकेच मान वेळावुनी ठुमकत लचकत गेली.
पैंजणाची छुम छुम मना नादवत लहरली.

कान्हाच्या मिश्कील लीलांना लीलया पहा फसली.
आजर्वे करी रासलीला तरी नंदनाची प्रिया ही रुसलेली.

सप्तरंगांत भिजुनी मादक शहाऱ्यात ती शहारली.
अधोवदनी बावरी साजणी कान्हाच्या मनमानसी रुजली.

होळीची ज्वाला जणु त्याच्या रोम रोमात भडकली.
रंगुनी रंगात प्रणयदंग कृष्णाराधेची प्रीत बहरली गोजिरी.

No comments: