जीव जडला तुझ्यावर...

जीव जडला तुझ्यावर...
कसा तो माहित नाही.....
मनात एकच वादळ उठल..
सांगायला जमत नाही....

तू आहेस अशी कि......
काय सांगाव तुझ्या बद्दल..
शब्द मला सुचत नाही..
काय झाल मला अस 
मला काहीच का कळल नाही.........

ठाव तुझ्या मनाचा 
मला तर कळून चुकला..
प्राण अर्पावा तुझावर..
प्रेम भाव कसा दाटला........

हिम्मत नाही मला
नजरेला तुझ्या नजर द्यायची
तरीही नजर पडेलच तुझ्यावर 
कधीही वाटल न्हवत 
कि, जीव ओवाळीन मी तुझ्यावर........

शक्य नाही तेच मनाला का पटल
अळूवावरच पाणी आज अळूवरच साटल
निरागस मनाला आज कोड्यात टाकल 
जीव जडेल तुझ्यावर अस कधीच नाही वाटल.........

No comments: