कुठेतरी.. कुठेतरी.. असेल ती !


जिथे जग आहे माझे, सोबत तिच्या..
जिथे मी, जिथे ती, जिथे भावना माझ्या नि तिच्या ||
जिथे होई सकाळ पापण्यांच्या किरणांनी तिच्या..
जिथे ऐके अंगाई चंद्र, मखमली कुशीत तिच्या ||
जाने न कोठे जग ते आहे, न जाने ती आहे वा नाही |
जिथे श्वास आहे हरवलेला, ओढीने तिच्या |
जिथे हरवलो, आहे गहिवरलो गोड स्वप्नात तिच्या ||
जिथे ती, ती, म्हणता.. डूबले मीपण आसमंतात तिच्या |
जिथे अवघे आयुष्य हासे, " मूर्खा " या शब्दात तिच्या ||
जाने न कोठे जग ते आहे, न जाने ती आहे वा नाही |
धेय्या पासून वाटा शोधत आहे..
धेय्यच हरवले आहे कोठेतरी, वाटांमध्ये !
कुठेतरी.. कुठेतरी.. असेल ती स्वप्नपरी..

No comments: