.........तिच दुःख ............

आजचं तिच दुःख
कोणीच पुसू शकणार नाही
तिच्यात वाहणारा सागर
आज तरी थकणार नाही

तिचा तो अवतारच
सांगत होता
घडलेल्या घटनेला
पाहत होता
हुंदके तिचे आवरण्याचा
प्रयन्त तो करत होता

आधार द्यायला सोबत
होती तिची हि माउली
सावरणार तरी कशी ती
होती तिची ती सावली

थोडेच दिवस घालवले
तिने त्या सावलीसोबत
अजून हातही न लावलेला
आणलेल्या तिच्या बाहुलीसोबत

ओठातून शब्द ऐकण्यासाठी
किती आतुर असावी ती
आणि क्षणात अडीच महिन्यात
हातात नसावी ती

खेळ सुरु होण्याआधीच
संपला होता तिचा
नियतीने असा - कसा डाव
मांडला होता तिचा

तिच दुःख हे आज तरी
सावरणार नाही
अथांग वाहणाऱ्या सागराला
आज तरी अडवणार नाही.

No comments: