कशे दिवस मस्त होते

कशे दिवस मस्त होते
तारुण्याचे , गाभूळ्लेले
व्यायामाचे ,
योगाचे ...!!
कवितेचे, स्वप्नाचे ,
प्रेमाचे दिवस होते
घराला घरपण होते
घर म्हणजे श्रीखंड होते
आंबट चिंबट चवदार होते
सगळे कसे मस्त होते
तशात ती आली
गोरी नव्हती काळी नव्हती
मधला असा रंग होतां
असा रंग असा रंग
डंख मारून पसार झाला
जाड नव्हती ,लुकडी नव्हती
गाभुळलेली मस्त होती
अशी चव- तशी चव
कधीसुद्धा माहित नव्हती
गळ्यात चेन
कानात रिंग
केसात गजरा
आणि असे मस्त गाणे
वातावरण भारून गेले
छानच होती
मस्त होती
सुंदर अशी गझल होती
गीत होते
सूर होते
सास तेरी मदिर मदिर
जैसे रजनी गंधा .....
अशे मस्त... अशे मस्त
सुंदर ,भन्नाट
गीत होती
पुढे काय ..?
आज देखील म्हणतो आहे
दिवस कसे मस्त होते .....
आठवणीची पाखरे
कधीतरी येऊन बसतात
मनाच्या फांदीवर
छान झुलत झुलत
मस्त शिळ घालून जातात ......!

No comments: