माझ्या राखेचा एक कण....तुझ्या हातावर. प्रेमात...

माझ्या राखेचा एक कण....तुझ्या हातावर.
प्रेमात तुझ्या मिळाले मला जे एकटेपण
त्याचा कस् माझा विझता श्वास
शेवटच्या या वळनावर आता प्रिये
शेवटची पुन्हा तुझीच आस ......

एकदा तुझा हात हातात धरून
निशब्द उभे रहायचं आहे... उमजुन घे
नाहीतर तुझा हात तूच पकड़ स्वतः
असेल तुझाच पण माझा समजुन घे

दोन्ही हात जोडून प्रार्थना कर
म्हण देवा याचे ह्रदय चिरून टाक
असेल जर त्याची थोडी कदर तर
आजच त्याला मारून टाक

मी मेल्यावर मग अर्थिवर उभी रहा
अणि स्तब्ध नयनांनी सगळ पहा ...
आसवांना मात्र स्पष्टपणे सांग घोळ घालायचा नाही
तो मेला आहे...त्याचा हट्ट धरायचा नाही ...

आग विझल्यावर मग थोडी जवळ जा
कुठे वाचलो का मी एकदा निरखून पहा
सव्तःला सांग व्हायच ते होउन गेलं
वेड्याचं आयुष्य वेड्यातच गेलं ...

उसासा टाकुन मग कामाला लाग
शेवटच एकदा माझ्याशी वैर्यासार्ख वाग
थोडीशी राख माझी बांधून घे
जड़ झाली तर वहायला नदीवर ने

राख नादित वाहून दे ,सगळकाही संपलं असेल
जे झाल मझ्यासंग तुझ्या ध्यानातही उरल नसेल
संपलेल्या खेळTचा मग तू संपून टाक डाव
फ़क्त वहायचा आधी मडकं एकदा हृदयाला लाव

बघ... राखेचा एक कण तुझ्या हातावर राहिल
शेवटच का होईना तुझाकड़े आशेन् पहिल
त्यालाही तुझा अश्रुची चव तू कळवणार का ?
विझवून अश्रुत एकदा पुन्हा त्यास्...जळवणार का ?

No comments: