प्रेम म्हणजे काय असतं


प्रेम म्हणजे काय असतं
कधी "छप्पर फाड के" कधी फाटक्यात पाय असतं
 
प्रेम उगवतीचा सुर्य
कधी पश्चिमेचा सुर्यास्त असतो
प्रेम झालं ह्याच्यापेक्षा प्रेम होईल
हाच विचार मस्त असतो
जगातल्या सगळ्या वेदनांवर प्रेम छान उपाय असतं
 
प्रेम म्हणजे कधी तुटलेली काठी
कधी मजबुत आधार असतं
त्यात कधी प्रेमळ चुंबन असतं
कधी चपलांचा मार असतं
प्रेम दुधात मिसळलेलं पाणी तर कधी दुधावरची साय असतं
 
वर्गातल्या आवडत्या मुलीला बघुन
शेंबडया दहावीकराच्या मनात नगारे वाजतात
अन बागेतल्या बाकडयावर बसलेले
म्हातारे आजोबा आजींना बघुन हळुचं लाजतात.
प्रेम किशोर वयात होतं,प्रेम म्हातारपणी होतं कारण प्रेमाला वय नसतं
 
एखादा दिवस-रात्र हमाली करणारा
भाजी विक्या त्या गोड मुलीकडे पाहतो
आठ तासाचा बांधील बंदा बाईकवर जाताना
फोर-व्हीलर वालीला पहात राहतो
प्रेम कधी हाय-फाय तर कधी गावठीतला न्हाय असतं
 
प्रेमात सगळ्याचं चवी येतात
तिखट आंबट,गोड,कडु
सारखं गोड बोलणं काय असतं
कधीतरी त्यात असावं रडु.
प्रेम कधी सात मजली स्माईल कधी छोटसं क्राय असतं

No comments: