ते मखमली दिवस…!!





किती दिवस मागे गेलेत,मला तरीही आठवतं,
ते मखमली दुर्मिळ दिवस,पापण्या अझुन साठवतं;
तास अन तास तुझे आतुर डोळे असायचे, मी व्हायला नजरित,
मी दूर रस्त्या कड़ी दिसताच,तू हसायची जणू,मोगर कळी गजरित;
किती जिवापाड तू वाट पहायची,की कधी मी दिसतो,
तुला पाहताच ते ठराविक लपलं स्मित,कधी मी हसतो;
ती वाट बघण्याचा ठरलेला, तुझा तो कठडा,
वर्षाहून मोठा वाटायचा, तो काटलेला आठवडा;
माझ्या जिना चढन्यानीच, तूला काटवायची हुडहुडी,
श्वासायची तू माझ्या, वरच्या खीशीत गजर्याची पुडी;
माझ्या थंडावलेल्या हाथ तळव्यांना तू सुवासून ओठायची,
आणलेला गजरा मीच मळावा, म्हणून तू घीरकत पाठायची;
कधी मी माळून नाकावतो गजरा,म्हणून तू व्हायची अधीर,
माझ्या थंड लागल्या बोटानच,तू सोडायची पाळला धीर;
ठरल्या जागी ओठ माझे टेकताच,तूझं ते होणं बेभान,
माझ्या अंगी कडाडणारं ते विजेचं थैमान;
पुढे काय व्हायचं ते स्मरणीच ठेवणं छान वाटतं,
एक एक नाजूक क्षणनांची,जशी वादळी लाट लाटतं;
तुला आज कडी लटाकल्या वेणी, झोपलेलं पाहून वाटलं,
कितीही दिवस गेले तरी,तू तशीच दिसते हे पटलं;
वाटलं यावं जवळ, न देता कोणतीही चाहूल,
एकदा गारठल्या तळव्यानी,गुदगुदावं ते मेंदी नक्षीत पाउल.
प्रासंगिक प्रणय संवेदनांनी, धुंदावून वाढलं हे प्रेम साहस,
कदाचित तू विसरलीस पण, मी अझुनही जगतोय ते मखमली दिवस....!

No comments: