एक दिवस.......

एक दिवस लपाछपी खेळलो आपण
कुठे लपली होती कुणास ठाउक?
सापडलीच नाहीस लवकर
आणि मग भो केलस एकदम...
मी रागावलो खुप,
हे काय खेळण म्हणुन...
तू म्हणालीस
एवढा काय चिडतोस,
मी काय हरवले होते?
मग झाला समझोता
आणि खुप गप्पा मारल्या...
हरवन्याच्या अन् सापडन्याच्या...
रंगांच्या कांडया हरवल्या
तेव्हा तू कशी भांडलीस बहिनीशी,
आणि तुझी बाहुली हरवली
तेव्हा किती रडलीस...
माझी ब्याट हरवली
तेव्हा मी घर कसं डोक्यावर घेतलं
आणि सरान्नी भेट दिलेलं पेन हरवलं
तेव्हा मी एका मुलाला कसं बुकलून काढलं
या सगल्याची उजळणी झाली...
त्यावर तू म्हणालीस,
लहानपण कसं छान असतं
पण आता आपण मोठे झालोत
आता कळतं आपल्याला
अमुक काही हरवलं
त्यासाठी त्रागा नसतो करायचा,
नसतं वैतागायचं,
सोडून द्यायचं,
दुसरी वस्तु आणायची...
मीही शहान्यासारखं हो म्हणालो,
अन् एक दिवस अचानक
तूच हरवून गेलीस
आणि क्षणार्धात मला कळलं
मी मुलीच मोठा झालेलो नाही...

No comments: