आता ते सर्व क्षण आठवतो


आता ते सर्व क्षण आठवतो
ज्यांना मी कधीच समजू शकलो नाही
मीही खूप आनंदी होतो इतरांप्रमाणे
जेव्हा त्या क्षणां समवेत होतो

नव्हते कुणाची पर्वा मलाही
नव्हते कोणतीही सीमा मलाही
नव्हते कुणाची भीती मलाही
जेव्हा तिच्या समवेत असायचो मी

आता ते सर्व क्षण आठवतो
ज्यांना मी कधीच समजू शकलो नाही
होता तोच चंद्र आम्ही असल्याची साक्ष देणारा
दूर असतांना निरोप आमचे घेऊन येणारा

बिझी असायचा फोन आमचाही
जेव्हा एकमेकांशी तासंतास गप्पा मारायचो आम्हीही
स्वप्नांच्या सुंदर विश्वात हजेरी असायची आमचीही
जेव्हा एकमेकांच्या विचारात असाच डुबायचो आम्हीही

आता ते सर्व क्षण आठवतो
ज्यांना मी कधीच समजू शकलो नाही
खूप काही ठरवायचो एकटे असल्यावर
मात्र गप्पच बसायचो एकमेकांसमोर आल्यावर

कळत होते सर्व तिलाही
पण मीही उगच चेष्टा करायचो
मीच नेहमी बोलावं अस ती हट्ट धरायची
पण त्यावेळी मी मात्र शांत बसायचो

आता ते सर्व क्षण आठवतो
ज्यांना मी कधीच समजू शकलो नाही
खूप गप्पा मारत बसायचो
मात्र तोच विषय नेहमी टाळायचो

फार उशीरा का होईना कळू लागले आम्हांलाही
पण आता बोलणार कोण आधी
या विचारातच आम्ही मात्र गप्प बसायचो
तू की मी या प्रश्नातच घुटमळत रहायचो

आता ते सर्व क्षण आठवतो
ज्यांना मी कधीच समजू शकलो नाही
पण हाच प्रश्न घातक होईल
असं कधीच वाटले नव्हते मलाही

मात्र आता असे वाटते
फक्त एकदा तिने समोर यावे
समोर येऊन माझ्याकडे
एकदाप्रेमवेड्या त्या नजरेने बघावे

सांगेल सर्व तिलाही
पण आता तेही शक्य नाही
माझ्या एका हाकाने येईल
इतकी जवळ आता तीही नाही

आता ते सर्व क्षण आठवतो
ज्यांना मी कधेच समजू शकलो नाही
काय मी केलेले प्रेम खोटे होते ?
काय मी घातलेला वेळ तिच्यासाठी काहीच नव्हता ?

आजही सुटत नाही प्रश्न हे
माहित आहे सर्व उत्तरे तिला
पण प्रश्नच मी कधी केला नाही तिला
काय प्रश्न शोधत असेल ती माझा ?

ठाऊक असते की दुरावा प्रेमात असतो
तर प्रेम या शब्दापासूनही दूर राहिलो असतो
आजही तिन प्रश्न मला नेहमी पडतात
1) काय प्रेम या शब्दाला काही अर्थ आहे?
2) काय प्रेमाला समजुन घेणारं कोणी आहे?
3) काय माझ्या या प्रश्नांचे उत्तर् देणारं कोणी आहे?

No comments: