एकच प्याला आज रिता झाला

करतो आयुष्याचे आज मोजमाप
कधी केलं पुण्य कधी केलं पाप
सांगण्यासारखं तुम्हाला आहे अमाप
एकच प्याला आज रिता झाला॥१॥
करितो बालपणापासुन सुरुवात
निरागसता कुटुन भरली त्यात
ती शोधण्या गेली सारी हयात
एकच प्याला आज रिता झाला॥२॥
निरागस चेहर्यात होता खट्याळपणा
वागण्यात होता माझ्या खोड्याळपणा
सगळे म्हणायचे पुरे तुझा नाठाळपणा
एकच प्याला आज रिता झाला॥३॥
वर्गात पहिला नंबर येण्याची
असे कायम इच्छा आईबाबांची
साथीला होती त्यांच्या, नेहमी छडी वेताची
एकच प्याला आज रिता झाला॥४॥
एकीकडे त्यांचा असायचा तो अट्टाहास
मी कसा बसा व्हायचो काठावर पास
त्या दिवसा पुरता घडायचा उपवास
एकच प्याला आज रिता झाला॥५॥
एकदा नमिला मी धाडलं लव-लेटर
तिच्या बापाचा मार पडला लेटर
नमि म्हणाली, "ट्राय अगेन लेटर"
एकच प्याला आज रिता झाला॥६॥
नमि गेली शाळा सोडून दुसर्या गावात
चावट आठवणी तरळल्या डोळ्यात
सारं काही माफ असतं त्या कच्च्या वयात
एकच प्याला आज रिता झाला॥७॥
 
धडपडत ठेचकाळत थोडा मोठा झालो
स्पर्धेच्या युगात लढाई लढुन आलो
यशापयशाची गोळा-बेरीज करुन आलो
एकच प्याला आज रिता झाला॥८॥
कॉलेजमधे कट्ट्यावर असायचो चारचौघात
शिट्या मारणे,छेड काढणे व्हायचेच ओघात
त्याच नादात पडलो एकदोघींच्या प्रेमात
एकच प्याला आज रिता झाला॥९॥
भाईगिरीची चुणुक दाखवायचो उत्साहात
पोरींवर इंप्रेशन मारायचो दिमाखात
एखादी खायचो ही कानशिलात
एकच प्याला आज रिता झाला॥१०॥
आयुष्यात एका वळणावर थांबलो
वाटले इथपर्यंत विनाकारण रांगलो
अरे माझ्या अस्तित्वासाठी झुंजलो
एकच प्याला आज रिता झाला॥११॥
आता स्पर्धा संपली प्रगतीपुस्तकाची
चढाओढ सुरु झाली अस्तित्वाची
किंमत कळली तेव्हा आयुष्याची
एकच प्याला आज रिता झाला॥१२॥
खुप झगडुन मनासारखं काम सुरु झालं
मग माझं बस्तान निट बसु लागलं
आई-वडिलांच्या संस्कारांच आज चिज झालं
एकच प्याला आज रिता झाला॥१३॥
खुप झगडुन मनासारखं काम सुरु झालं
मग माझं बस्तान निट बसु लागलं
आई-वडिलांच्या संस्कारांच आज चिज झालं
एकच प्याला आज रिता झाला॥१३॥
पहिलीच भेट आपली स्मरते
काळीज त्याच क्षणी विरघळते
अन प्रेमाची उभारी उसळते
एकच प्याला आज रिता झाला॥१४॥
सुगंध दरवळला अत्तराचा
त्यातुन गंध मोगर्याचा
अन उभार तव यौवनाचा
एकच प्याला आज रिता झाला॥१५॥
मग सुरु झाल्या नियमित भेटीगाठी
जुळु लागल्या भविष्यातल्या रेशिमगाठी
आता का प्रेमास तुझी आडकाठी ???
एकच प्याला आज रिता झाला॥१६॥
तुझं ते माझ्यावर रुसणं
गाल फ़ुगवुन रागवुन बसणं
अन त्यावर माझं मिश्किल हसणं
एकच प्याला आज रिता झाला॥१७॥
साजणे लवकर ये मज पाशी
खेळू नकोस असं काळजाशी
राहू नकोस लांब, तू हि अशी
एकच प्याला आज रिता झाला॥१८॥
आज तुझी खुप वाट पाहिली
पण वाट शेवटी रिती राहिली
ती रात्र तुझ्या आठवणीना वाहिली
एकच प्याला आज रिता झाला॥१९॥
तुझ्या आठवणीत आता ६ पेग झाले
तुझे गुण गान गायचेच राहिले
ह्यापुढील पेग तुझ्यासाठीच भरले
एकच प्याला आज रिता झाला॥२०॥
तुझा समजुतदारपणा मला आवडतो
मी स्वत: तसं व्हायचं ठरवतो
पण तुला पाहिल्यावर भान विसरतो
एकच प्याला आज रिता झाला॥२१॥
तुझी नातं जपण्याची कला भन्नाट आहे
तुला आपल्या नात्याची जाण आहे
तुझ्यात सद्गुणांची खाण आहे
एकच प्याला आज रिता झाला॥२२॥
तु आपल्या सहजिवनाची स्वप्न रंगवतेस
मला तुझ्या ह्र्दयात अढळ स्थानी बसवतेस
मुलांगत हट्ट करुन मला हसवतेस
एकच प्याला आज रिता झाला॥२३॥
वसे सरस्वती तुझ्या वाणीत
जसे खळखळे पाणी नदीत
नसे तुझ्यासम कुणी या भुमित
एकच प्याला आज रिता झाला॥२४॥
तुझा प्रेमावर विश्वास आहे
माझी तुझ्यावर श्रद्धा आहे
पण तुला दुनियेची फिकिर आहे
एकच प्याला आज रिता झाला॥२५॥
शाळा कॉलेजच्या गोष्टी ६-६ प्याल्यात सांगुन झाल्या
तुझ्या...अरे १२ झाले तरी अपुर्याच राहिल्या
म्हणुनच ह्यापुढील मधुसरिता तुझ्यासाठीच वाहिल्या
एकच प्याला आज रिता झाला॥२६॥

No comments: