कसा बसा जगतो मी , पाहुनि चेहरा तुझा


कसा बसा जगतो मी , पाहुनि चेहरा तुझा
अनेक आठवण उरात आहे.. जपुनी मोरपिसा जसा
वाऱ्यास बंध नाही.. जातो स्पर्शून सार्या दिशा ...
तसा गुलाब वाऱ्यावरी.. गंध अजुनी दरवळे तुझा...
कसा बसा जगतो मी , पाहुनि चेहरा तुझा..
अनेक आठवण उरात आहे.. जपुनी मोरपिसा जसा ..
उन्ह हे तळपते वाटेत माझ्या.. आणि काटे अनेक विषारी
तरीही वाट काढतो मी... फुलातून भवरा जसा
कसा बसा जगतो मी , पाहुनि चेहरा तुझा..
अनेक आठवण ऊरात आहे.. जपुनी मोरपिसा जसा ..
खिन्न वाट एकटी... मज सरता सरत नाही कधी..
असे आयुष्य जगणे मला, प्राण वाटे नको नकोसा..
कसा बसा जगतो मी , पाहुनि चेहरा तुझा..
अनेक आठवण ऊरात आहे.. जपुनी मोरपिसा जसा ..

असे काही झाले निखारे क्षणांचे माझ्या
न शमले ते अश्रुंपरी, जळताना दिसे धूर जसा
कसा बसा जगतो मी ,पाहुनि चेहरा तुझा..
अनेक आठवण ऊरात आहे.. जपुनी मोरपिसा जसा ..

No comments: