थेंब अश्रुंचे दोन गालावरती..

थेंब अश्रुंचे दोन गालावरती.. 
कसे पुसायाचे राहून गेले.. 
लपविलेले दु:ख माझे चार चेहरे पाहून गेले.. . . 
सांगितले बरेच काही.. 
आनंदाश्रु अन काही बाही.. 
अर्थ सुकल्या आसवाचा परी लावायचा तो लावून गेले.. .
लपविलेले जे दु:ख माझे चार चेहरे पाहून गेले..
पुसले डोळे.. 
हसून खोटे चाचपले कितिक मुखवटे मुखवट्याला चेहर्‍यावरती चढवायाचे आज राहून गेले . 
लपविलेले जे दु:ख माझे चार चेहरे पाहून गेले..
हसून आता.. 
विसरून सारे वावरते जणू..
 उनाड वारे हसताना पुन्हा भरले डोळे पापणीतून अश्रु वाहून गेले .
 लपविलेले जे दु:ख माझे चार चेहरे पाहून गेले.. . .
 थेंब अश्रुंचे दोन गालावरती.. 
कसे पुसायाचे राहून गेले.. 
लपविलेले दु:ख माझे चार चेहरे पाहून गेले..

No comments: