मित्रांनो जाणून घ्या काही

मित्रांनो जाणून घ्या काही

प्रत्येक मुलीच्या मनात
एक सुंदर स्वप्न असत
चांगला जोडीदार मिळावा
अस मागण असत

... विचारून तर बघा तिला
तुझ मन काय म्हणत?
ओठांवरच्या शब्दांनीच सारी
अपेक्षा व्यक्त करत
मुलीच मन ते
सैरावैरा धावत असत
कधी खेड तर कधी शहर
गाठत असत

कुणाला सुंदर ,कुणाला शिक्षित

कुणाला गोरी, कुणाला उंच
प्रत्येकाच मुलीविषयीच
वेगळच मागण असत
तडजोडीची वेळ आली ,
की मुलिलाच पुढे सरकाव लागत
नविन कुटुंबात प्रवेश करतांना

नात्यांच भान ठेवाव लागत

समाज वेगवेगळ्या
प्रथा काढतच असत
ते पूर्ण करता करता
मात्र बापाच्या जिवाच रान होत


२२ वर्ष जपलेल धन हे
शेवटी परकयाला द्याव लागत
जिवापाड जपलेल्या तुकड्याला
स्वत:पासून तोडाव लागत

येणारे लोक येउन जातात
खाणारे पिणारे मजा करून जातात
उरतात ते मुलीचे आई-बाप
जी दुसर्यांची ओझी वाहत असतात

कधी वाटत मुलगी होण पाप का?

आई-बापाला ही सजा का?
या रुढी परंपरा आशा कश्या?

मुलींच्या घरच्यांनीच पाळायच्या कश्या? — —

No comments: