सांग कशाला आलास तू???


उजाड़ होते जीवन माझे,
किती परी ते छान होते,
होते माझा मीच एकटा,
सुख किती परी तयात होते,

नाही वाटली ओढ़ कुणाची,
जवळी नव्हते जरी कुणी,
नाही लाभले प्रेम कुणाचे,
नव्हती तयाची खंत मनी,

जीवनात परी तू माझ्या येता,
स्वर्ग सुखाचा झरा वाहिला,
जीवनसाथी मानून तुजला,
मजा मी ना माजाचा राहिला,

धागा परी मध्येच तोडून,
सोडून मजला गेलास तू,
जायचेच जर अखेर होते,
सांग कशालाआलीस तू???
 
 
वाटलं नव्ह्तं मला, असं काही घडेल
वाटलं नव्ह्तं मला, असं काही घडेल
आपल्या मैत्रीच्या वृक्ष , असा कोलमडून पडेल

याच मैत्रीला कधी काळी, मधाचा गोडवा होता
त्या दिवसात रोजच, दिवाळी पाडवा होता

जेव्हा रडत होतो, तेव्हा मैत्रीनेच हसवलं
नुकताच हसायला शिकलो, आणि पुन्हा मैत्रीनेच रडवलं

चुक तुझी ही नसावी, किंवा माझी ही नसावी
काय सांगावं आपल्या, दैवातच खोट असावी

कारणा शिवाय दुरावलो, याचच वाईट वाटतं
रडून रडून शेवटी, डोळ्यातलं पाणी आटतं

विसरुन सारं दु:ख, मी मनाला हवं आवरयला
तु परतनार असशील तर, मी तयार आहे सावरायला

तु परते पर्यंत मी, तुझीच वाट पाहीन
आत्ताच काय ? अजन्म तुझाच मित्र राहीन

जपुन पावलं टाकत जा, चुकुनही घसरु नकोस
आठवण नाही काढलीस, तरी मला विसरु नकोस

वाटलं नव्ह्तं खरचं, कधी असं घडेल
आपल्या मैत्रीच्या वृक्ष , असा कोलमडून पडेल

No comments: