विजयस्तंभ

विजयस्तंभ 

मराठी मातीतला माणुस
जेव्हा 'जय महाराष्ट्र' करतो
तेव्हा तो महाराष्ट्र म्हणजे महारांच्या राष्ट्राचा
मनापासुन सार्थ अभिमान धरतो

महाराष्ट्राचे मुळ रहीवाशी महार
शूर-लढ्वय्ये त्यांचा इतिहास गौरवशाली
१ जानेवारी १८१८ रोजी नववर्षाच्या सुरुवातीला
त्यांनी उतरवला जरीपटका खाली

मुठभर महारांनी कित्येक हजारांना
मोठ्या पराक्रमाने कापून फेकले
त्यांचा रुद्रावतार पाहून 
पळु लागले पेशवे सेनापती बापु गो
खले

शुरवीर महार सैनिकांनी
पाठलाग करुन केली पळती भुई थोडी
ठार करुन गनिमाला
उभारली विजयाची गुढी

पेशवाईच्या कारभारात
अन्याय अत्याचाराचे तण होते माजले
जुलुमाविरोधात पेटुन उठलेल्या मुठभर महारांनी
बलाढ्य पेशव्यांना पाणी पाजले

एकीकडे पेशव्यांचे २५,००० घोडदळ आणि ५००० पायदळ 
असं भलंमोठं सैन्य
त्याविरोधात महार रेजिमेंटकडे
५०० पायदळ, ३०० घोडदळ, ५ बटालियन ऑफिसर्स आणि 
तोफा चालवणारे २४ ब्रिटिश सैनिक नगण्य

व्यवस्थेविरोधात जेव्हा
पेटुन उठतो महार
एकत्र येवुन स्वाभिमानाने
करतो घनघोर प्रहार

रात्रभर कैक मैलाचा प्रवास करुन
महार रेजिमेंट भीमा-कोरेगावास आली
थकलेल्या योद्ध्यांना भीमा नदीचे पाणी पिण्याची
उसंतसुद्ध नाही मिळाली.

पाण्याविना जीव झाला कासावीस 
तरी प्राणपणाने लढले महार
आत्मसन्मानार्थ प्राणांची पर्वा न करणार्‍या 
शूरांचे मानवतेवर उपकार

अनेक योद्धे पडले धारातीर्थी
तरी शेवटच्या श्वासापर्यंत लढले
एकेका सैनिकाला होते
चाळीस पन्नासांनी वेढले.

सपासप तलवार चालवुन
महारांनी पराक्रमाची शर्थ केली
या घनघोर युद्धानंतर 
क्रुर पेशवाई लयाला गेली

शिवाजीमहाराजांच्या महाराष्ट्रात
पुन्हा झाला समतेचा जयजयकर
महार रेजिमेंटचा पराक्रम
पोहोचला साता समुद्रापार

परकीय इंग्रजांनी 
पराक्रम महारांचा जाणला
२६ मार्च १८२१ ला
विजयस्तंभाचा पाया खणला
विजयस्तंभ ७५ फुट उंच
सांगतो पराक्रमाची गाथा
मानवतावादी नववर्षाची सुरुवात करती
टेकवुन महार हुतात्म्यांपुढे माथा 

क्रांतीवीर बहाद्दुरांना अभिवादन
ज्यांनी आत्मसन्मानार्थ पत्करले मरण
व्यवस्थेविरोधात लढण्याची प्रेरणा देई विजयस्तंभ
आणि नववर्षाचा सुर्य घेवुन येतो क्रांतीचे नवे किरण

महार रेजिमेंटच्या पराक्रमाला
जगाच्या इतिहासात नाही तोड
चला उठा जगभरातील मानवतावाद्यांनो
अन्यायाविरोधात लढु; उत्तर देवू सडेतोड

प्रेमाने समजवु
वेळ पडली तर करु पानिपत
अन्याय अत्याचाराविरोधात संघर्ष करण्या
सबंध जगतात आपले एकमत.

----कवी प्रशांत गंगावणे
(.."प्रस्थापितांची फुसकी चळवळ" या कवितासंग्रहाचे कवी )

No comments: