किती करशील जगताना तळमळ माणसा !

किती करशील जगताना तळमळ माणसा !

समाधानी ठेव आयुष्यातली वर्दळ माणसा !इथे नशिबास जिंकाया कष्ट झेलतो तुही !

का विसरतोय प्रारब्धातील अटकळ माणसा !



हा समुद्र स्तब्ध आज लाटांच्या मग्नतेत!

का नदीत शोधतो सागरातली खार्वळ माणसा !जरी फाटक्या झोळीत तुझिया संसार आता !

घेता कवेत स्वप्नांना लाव ठिगळ माणसा !लोक नशिल्या हलाहलास आयुष्य अर्पून आता !

कुठवर धसशील तू चैनीत हे पाताळ माणसा !हाच पुरुषोत्तम सारे भूलोकीतले नियम पाळून !

कुठे कलियुगात शोधसी तू स्वर्गीचे आभाळ माणसा !

No comments: