पश्चाताप



अतीत ते ऐकुन तुझे ।हृदय व्याकुळ झाले माझे ॥
होकार म्हणुनच तर मी दिला ।जिवनाची साथ द्यायची तुला ॥
मासूम चेहरा पाहीला जेंव्हा ।सुख द्यायचे ठरवले तेंव्हा ॥
किती आहे तुझ्यावर प्रेम ।ते माझं काळीजच जाणतंय ॥
रागाच्या भरात निघालेले शब्द ।आपल्या वादाचं कारण बनतंय ॥
सांग प्रिये, तुझ्यावरील प्रितीची | साक्ष देण्यास मी काय करू ? ॥
खरच माफ करणार आहेस |कि आयुष्यभर पश्चाताप करू ॥

शांताराम कारंडे

No comments: