तासाभराच्या सोबतीत

तासाभराच्या सोबतीत
कातरवेळी ती सरली
सहवासाच्या वेलीवर
प्रीत आपली जुळली

आज बऱ्याच दिवसांनी
तिची भेट घडली
नजरेला नजर
मनाला मने भिडली

तिच्या मनाची खोली
नजरेने हळूच मोजली
मूक मूक प्रेमात
दोन मने भिजली
क्षणाची भेट माझी-तुझी
मनात थेट रुजली
प्रेमात तुझ्या लिहताना
कविता माझी सजली

No comments: