दूर दूर जाताना . . . दूर दूर जाताना

दूर दूर जाताना . . .

दूर दूर जाताना

मागे वळून पाहू नकोस

उमटलेल्या पावूल-खुणांना

पुन्हा पुन्हा हेरु नकोस

दूर दूर जाताना

मैफिल अशी रंगवू नकोस

गझल हि आळवताना

सूर असे छेडू नकोस

दूर दूर जाताना


गुंतवून मन रमवू नकोस

नजरेला नजर देऊन

घायाळ असे करू नकोस

दूर दूर जाताना

काळजावर वार करू नकोस

हास्य सुमने उधळताना

अश्रूंनी निरोप देवू नकोस.

दूर दूर जाताना . . .

No comments: