मी आणि माझी लेखणी यांत रंगलेला एक छोटासा संवाद...........



आज माझी लेखणी म्हणाली............
का रे तू मला सारखं सतावत असतोस
तुझ्या फावल्या वेळात मला त्रास देत असतोस ??
खरंच मी दमले रे आता मलाही जरा एकांत हवाय
सारखा लिहित असतोस तू कुठेतरी पूर्णविराम हवाय

मी म्हटलं........
अग माझं काही चुकलं असेल तर स्पष्टपणे सांग मला
पण असं अर्ध्या वाटेत एकट सोडून जाऊ नकोस
तुलाहि आराम हवाय हे कळलंय आता मला
त्यामुळे उगाच अशी चिडू नकोस

ती (लेखणी)...........
अरे मी तुझ्यावर चिडले व रागावले नाही पण मलाही थोड समजून घे
शब्द तुला सारखे सुचत असतात परंतु मलाहि क्षणभर निवांत श्वास घेण्याची मोकळीक दे
काही दिवस मलाही तुझ्यापासून दूर जावून बघायचंय
तुला माझ्याविना जमेल का राहायला मला जाणून घ्यायचयं

मी........
आईबाबा,भाऊ,बहिण हि नाती रक्ताची आहेत
पण शब्द आणि लेखणी हि दोघे माझी जिव्हाळ्याची नाती............
जेव्हा लिहायला सुरुवात केली ह्यांचीही रक्ताच्या नात्यांत भर पडली
अन तेथूनच पुढे मला तुजसंग जगण्याची सवय जडली

मी..............
शेवटी एवढंच म्हणेन तुला
"माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तू (लेखणी) मला सोबत हवी
तुझा मित्र म्हणून जगायला आवडेल मला नाही व्हायचंय कवी "..................!!!!

No comments: