एकदा तिच्या सायकलला धडकलो, पाहून तिला थोडा दचकलो

एकदा तिच्या सायकलला धडकलो,
पाहून तिला थोडा दचकलो,
ती चीड्ल्यान जरा गडबडलो,
काही काळाने तिच्याच प्रेमात पडलो,

तशी ती रोजच कोलेजला असायची,
थोडीशी भोळी, थोडी सालस दिसायची,
झालेल्या घटनेमुळे रागानेच बघायची,
हौस मला भारी तिच्यावर प्रेम करायची,

स्वप्न तिचे रंगवत होतो,
तिच्या भेटीसाठी आसुसलो होतो,
कधी तरी तिच्या मनातल कळाव,
आपलाही प्रेम तिने समजावं,

कधी तरी ती एकांतात भेटली,
बघून तिला प्रेमाची पत्रिका देऊ केली,
तिला माझ प्रेम मान्य नव्हत,
राजकुमार होता दुसराच हे ठावं नव्हत,

No comments: