म्हणायचीस

म्हणायचीस माझ तुझ्यावर प्रेम आहे
मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही
वाटल तेव्हा मला मी खूप नशीबवान आहे
हिच्या आयुष्यात माझ्याशिवाय कोणीच नाही

एक दिवस मी तुला म्हंटल कस
तुला पूर्वीपासून ओळखतो जस
हे खर प्रेम आहे मी मानू कस
डोळे मिटताच चेहरा दिसावा जस

म्हणालीस I LOVE YOU मला
वाटल नव्हत की ते खोट असेल
माझ्याशिवाय हि तुझ्या आयुष्यात
प्रेम करणार कोणी तिसराच असेल

आता तू नाही आहेस आयुष्यात माझ्या
माहित नाही कोण आहे आयुष्यात तुझ्या
खेळ मांडला होतास तू भावनांच्या माझ्या
असेच दिवस येतील आयुष्यातही तुझ्या

No comments: